पिंपरी – इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटींनी फॉलो करा व 30 टक्के नफा मिळविण्याचे आमिष दाखवून दोघांनी महिलेकडून तब्बल पावणे नऊ लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार 6 मे ते 9 मे यादरम्यान हिंजवडी येथे घडला आहे.
याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून टेलिग्राम युजर्स आनाया शर्मा व आरना खत्री यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी टेलीग्रामद्वारे संपर्क साधला. त्यानी फिर्यादीला सेलेब्रिटींना फोलो करायला सांगितलेव वेळोवेळी पैस गुंतवण्यास सांगितले.
यातून 30 टक्के जास्त फायदा मिळेल असे आमिष दाखवले. मात्र फिर्यादी कडून 8 लाख 75 हजार रुपये घेत याचा कोणताही नफा परत केलेला नाही. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.