पाच गुन्ह्यांतील फरार आरोपी जेरबंद

खंडणी-दरोडा विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी –चिखली येथील घरफोडीच्या गुन्ह्यांसह पाच गुन्ह्यात फरार असेलल्या आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. तपासात आरोपीवरील पाच गुन्हे देखील उघड झाले आहेत. सचिन धनराज पवार असे अटक आरोपीचे नाव आहे.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील एका दुकानाचे शटर उचकटून चोरीच्या गुन्हात सागर गायकवाड याला पोलिसांनी आधीच अटक केली होती. तपासा दरम्यान गायकवाडने साथीदार पवन्या बाबर व सचिन पवार यांच्यासह गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यातील सचिन पवार याला भोसरी एमआयडीसी परिसरातून अटक कऱण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 13 हजार रुपयांचा मुद्देमाल व एक बोलेरो जीप असा एकूण 4 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पवारने निगडी, चाकण, खांदेश्‍वर, नवी मुंबई या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण पाच गुन्हे केले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगम, सागर शेडगे, प्रदीप गोडांबे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.