आरटीओ कार्यालयाचे दोन दिवस कामकाज बंद

निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण ः शिकाऊ परवाना व वेळ दिलेल्या नागरिकांचे काम सुरू राहणार

दैनंदिन कामकाजावर परिणाम
23 कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणासाठी जाणार असल्यामुळे याचा थेट परिणाम आरटीओच्या दैनंदिन कामांवर होणार आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, वाहनांचे क्रमांक, खटला, परवाना नूतनीकरण या कामांसाठी मनुष्यबळ नसल्याने ही कामे बंद ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी (दि. 16) इलेक्‍शन डयुटी तर, बुधवारी (दि. 17) शासकीय सुट्टी असल्याने दोन दिवस कामकाज बंद राहणार आहे. शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पिंपरी – सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा भाग हा दोन लोकसभा क्षेत्रामध्ये विभागला आहे. तसेच दोन्ही लोकसभा मतदार संघ खूप मोठे असल्याने निवडणुकीचे कार्य पार पाडण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज भासत आहे. निवडणुकीच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनाही “इलेक्‍शन ड्युटी’ लावण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामुळे मंगळवारी (दि. 11) कार्यालयातील बऱ्यापैकी कामकाज बंद राहणार आहे. मात्र, शिकाऊ परवाना आणि नागरिकांना दिलेल्या वेळेतील कामे सुरु राहणार आहेत. तसेच बुधवारी (दि. 17) शासकीय सुट्टी असल्याने आरटीओ कार्यालय बंद असणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आरटीओ कार्यालयातील आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पूर्वीच निवडणुकीच्या कामासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणखी कर्मचाऱ्यांनी माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार पुण्यासह पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची यादी देण्यात आली आहे. त्यापैकी पिंपरी आरटीओ कार्यालयातील जवळपास 23 कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे मंगळवारी दि. 16 रोजी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.