नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आग लागण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या लॉरेन मार्गावरील चपलांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी ही आग लागली.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाचे 26 बंब घटनास्थळी रावाना झाले आहेत.
गेल्या महिन्यात उत्तर दिल्लीच्या अजानमंडी भागात लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात करोल बाग येथे चार मजली हॉटेल आग लागून त्यात 17 जण मरण पावले. आग लागण्याच्या आजच्या घटनेमुळे निवासी भागातील कारखान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.