‘सीएएमुळे मुस्लिम नागरिकाला देश सोडावा लागल्यास आमदारकीचा राजीनामा देईल’

लखनऊ – देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलने चालू आहेत. अशातच भाजप आमदाराच्या वक्तव्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. जर सीएएमुळे त्यांच्या एकाही मुस्लिम नागरिकाला देश सोडून जावे लागल्यास ते आमदारकीचा पदाचा राजीनामा देईल, असे वक्तव्य भाजपचे आमदार डॉ. राधामोहन दास यांनी केले आहे.

डॉ. राधामोहन दास उत्तरप्रदेशस्थित गोरखपूरचे आमदार आहेत. संपर्क कार्यक्रमांतर्गत त्यांनी आपल्या मतदारसंघात मुस्लिमांशी संवाद साधला.

डॉ. राधामोहन दास म्हणाले कि, त्यांच्या मनातील भीतीचे काय कारण आहे? हे मी नागरिकांना विचारत आहे. सीएएमुळे  भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व काढण्यात येईल का, असे तेथील नागरिक मला विचारत आहेत. मी सीएएसंबंधी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरासन करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात अत्याचार केलेले मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.