नवी दिल्ली – राहुल गांधी भारताचे तुकडे करण्याचे राजकारण करत असल्याचा दावा करत दिल्ली भाजपने बुधवारी येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाजवळ निदर्शने केली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा देशाच्या संस्कृतीचा अपमान असल्याचेही भाजपने म्हटले आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि दिल्ली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा रिचा पांडे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या आंदोलनात भाग घेतला. चुग म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांची मालमत्ता आणि दागिने हिसकावून ते अल्पसंख्याकांना देण्याचे “षडयंत्र” रचले गेले आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा हा देशाच्या संस्कृतीचा अपमान आहे आणि राहुल गांधी भारताचे तुकडे करण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा जाहीरनामा तुष्टीकरणाने भरलेला आहे आणि त्यामुळे देश कमकुवत होईल, असे सचदेवा म्हणाले.