मुंबई – नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने भारतासह परदेशात देखील सिनेरसिकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात आर्चीची भूमिका वठवून रातोरात स्टार पदावर पोहोचलेली अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू’ सध्या आपल्या लूक मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला आहे.
नुकतंच रिंकूला मुंबईत एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. नेहमी ग्लॅम आणि मेकअपमध्ये असणारी रिंकू यावेळी अगदी कॅज्युअल लुकमध्ये दिसली. रिंकूनं यावेळी मेकअपही केला नव्हता. तिच्या नो मेकअप लुकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
रिंकूला पाहण्यासाठी पापाराझींनी आणि तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. सध्या रिंकूचे हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, फॅन्स देखील अभिनेत्रीच्या नो मेकअप लुकच्या प्रेमात पडले आहेत.
दरम्यान, सैराटनांतर रिंकूने अनेक चित्रपट केले परंतु आजही तिला अनेकजण ‘आर्ची’ याच नावाने ओळखतात. रिंकू आपल्या सोशल मिडीयावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. रिंकूने मराठीसह हिंदी आणि इतर भाषांमध्ये देखील चित्रपट केले आहेत. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं घेऊन येणाऱ्या रिंकूच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता आता प्रेक्षकांना आहे.