सध्या प्रेग्नेंसी एंजॉय करत असलेल्या करिना कपूर-खानने सैफ अली खानच्या आगामी “भूत पुलिस’ चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर करत गंमतीशीर पोस्ट लिहिली आहे. यामुळे चाहत्यांची धडकन वाढली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटात सैफसोबत अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडिस आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. करिनाने इंस्टाग्रामवर पोस्टर शेअर करत लिहिले की, “द न्यू नॉर्मल इज पॅरानॉर्मल’ म्हणजे “पॅरानॉर्मल ही एक नवीन सामान्य आहे. शुभेच्छा मित्रांनो.’
पवन कृपलानी दिग्दर्शित “भूत पुलिस’मध्ये सैफने पहिल्यांदाच अर्जुन आणि यामीसोबत काम केले आहे. हे पोस्टर खूप रंजक आणि कॉमिक दिसत आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा दाखवलेला नाही. यात जंगलात एक कॉटेज दिसत असून, ज्यात फक्त प्रकाश दिसून येत आहे.
जवळच एक रुग्णवाहिका उभी आहे, त्यावर वशीकरण तज्ज्ञ असे लिहिलेले आहे. दरम्यान, “भूत पुलिस’चे शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील संपूर्ण स्टार कास्टसह निर्माता रमेश तौरानी आणि दिग्दर्शक पवन कृपलानी यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित करण्यात येणार आहे.