Samantha Ruth Prabhu| अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने अभिनेता नागा चैतन्यशी लग्न केले होते. परंतु सहा वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नासह आजारपणाबद्दल तिने नेहमीच उघडपणे भाष्य केले आहे. समंथा गेल्या काही काळापासून मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचा सामना करत आहे. यानंतर आता तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती इन्फ्रारेट साऊना थेरपी घेताना दिसत होती.
सामंथाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. मात्र तिचा चेहरा दिसत नव्हता. तर केवळ गळ्यातील लॉकेट दिसत होते. हा फोटो डिलीट केल्यानंतर अभिनेत्रीचे चाहते तिच्या समर्थनात आले आणि त्यांनी फोटोला फेक म्हटले. या पोस्टमध्ये तिने इन्फ्रारेट साऊना थेरपीचे फायदे सुद्धा लिहिले आहेत.
समंथाने तिच्या आजारपणाविषयी आणि त्यावरील उपचाराविषयी लिहिलं असताना काही सोशल मीडिया युजर्सने तिचे फेक फोटो व्हायरल केले. समंथानेच तिच्या स्टोरीमध्ये हे न्यूड फोटो पोस्ट केले आणि लगेच डिलिट केले, असा दावा युजर्सनी केला आहे. तर समंथाच्या चाहत्यांनी ते फोटो फेक असल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, समंथाने 2022 मध्ये तिला मायोसिटीस हा ऑटोइम्युन आजार असल्याचा खुलासा केला होता. यामुळे तिला त ‘यशोदा’ चित्रपटाच्या प्रमोशन करता आले नव्हते.
समंथाने आजारपणावर उपचार घेण्यासाठी कामातून ब्रेक घेतला होता. आता ती बरी झाल्याने पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. त्याची ‘सिटाडेल हनी बनी’ ही वेबसिरीज प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. त्यात वरुण धवनही तिच्यासोबत दिसणार आहे.