बॉलीवूडची सनशाइन जॅकलीन फर्नांडिसने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले असून ती लवकरच रोहित शेट्टीच्या आगामी “सर्कस’ चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा करणार आहे. रोहितचे कौतुक करत जॅकलिन म्हणाली, “असे चित्रपट बनवणे सोपे नाहीत, जे तुमचे मनोरंजन करणारे, हसवणारे आणि तुम्हाला चांगला अनुभव देतील. मनोरंजन आणि व्यावसायिक चित्रपटाबद्दल विचार केल्यास रोहित शेट्टी यांचे नाव सर्वप्रथम येते. मी नेहमीच त्यांच्या चित्रपटांचा आनंद घेतला असून त्यासाठी घ्यावे लागत असलेल्या कष्टाबद्दलही मला पूर्ण जाणीव आहे.
मी त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी खूपच उत्साहित आहे आणि मी त्यांच्या सेटवर जाण्याची उत्सुकतेने वाट पाहात आहे. जॅकलीन ही स्वतः कठीण परिश्रम घेण्यासाठी ओळखली जाते. त्यात या प्रोजेक्टमध्ये आणखी जास्त मेहनत आणि मस्तीचा डोस देण्यासाठी ती तयार आहे. “सर्कस’ चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून पॉवर डायरेक्टरसोबत जॅकलीन आपला जलवा दाखविण्यास सज्ज झाली आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जॅकलीनने नुकताच मुंबईतील एक प्रोजेक्ट पूर्ण केला.
यानंतर ती तातडीने “भूत पुलिस’चे शूटिंग करण्यासाठी धर्मशाळा येथे रवाना झाली. तसेच ती रणवीर सिंहसोबत लवकरच “सर्कस’चे काम सुरू करणार आहे. याशिवाय ती सलमान खानसोबत “किक-2’मध्येही झळकणार आहे.