लंडन : येथील ऐतिहासिक लंडन ब्रिजवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. तेथे अनेकांना चाकूने भोसकण्यात आले. या हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. स्थानिक प्रमाण वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा हल्ला झाला. पोलिसांनी ही घटना दहशतवादी कृत्य असल्याचे कबूल केले आहे.
This is the moment police detained and shot a man on London Bridge pic.twitter.com/FFFdo42Ddk
— Edward Hardy (@EdwardTHardy) November 29, 2019
पोलिसांना त्याबाबतचा कॉल आल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बीबीसीचा बातमीदार घटनास्थळावर होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाहिले की, ब्रिजवर एका माणासावर अनेक जण हल्ला करत होते. त्यावेळी पोलिस तेथे आले. त्यांनी त्याच माणसाच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. पोलिसांनी या घटनेबाबत अजून स्पष्टता आली नसल्याचे सांगितले असून हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दहशतवाद्यांनी पोटाला स्फोटकासारखी वस्तू बांधली होती. मात्र त्यात स्फोटके होते की नाही त्याचा तपशूल न्यावैद्यकीय परीक्षणानंतर जाहीर करण्यात येईल. या हल्लेखोराला जमीनीवर झोपवून गोळ्या घातल्याचे व्हिडिओ चित्रण सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याल नागरिकांनी धरून खाली पाडले. मात्र पोलिस आल्यावर ते त्याच्या पासून पळताना दिसत आहेत. दुसऱ्या एका चित्रणात पोलिस त्याला बाजूने गोळ्या घालत असल्याचे चित्रीकरण आहे.
लंडनच्या ऍम्ब्युलन्स सेवेने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार, लंडन ब्रिजवरून मदतीसाठी अनेक फोन आले आहेत. तेथे यंत्रणा पाठवण्यात आली आहे. त्याचा तपशील मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू.
ब्रिटीश वाहतूक पोलिसांनी या घटनेनंतर लंडन ब्रिज वाहतुकीसाठी बंद केला असून कोणत्याही रेल्वेसेवा बंद कल्या नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान घटनास्थळाची दिशा सोडून कार्यालयातून नागरिकांनी आपल्या घरी परतावे, असे आवाहन करण्यात आले आहे.