पुणे – दत्तनगर येथे एका भाजीविक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून निर्घुन खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात विक्रेत्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
विलास जयवंत बांदल (५२, रा.त्रिमुर्ती रेसिडंन्सी, वंडरसिटी जवळ , कात्रज) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दततनगर बस थांब्याजवळ दोन व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी बांदल यांच्या डोक्यात,
तोंडावर दगड व वीट मारुन त्यांचा खून केला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त स्मार्तन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पोलीस निरीक्षक शरद झिने आदींनी भेट दिली.