फेक न्यूज प्रकरण: शेहला रशीदविरूद्ध फौजदारी तक्रार दाखल

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरबाबतचे कलम 370 हटवल्यानंतर काश्‍मीरमध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा दावा वारंवार सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला होता. अशाच एका प्रकरणामध्ये जेएनयूमध्ये शिकणारी काश्‍मीरी विद्यार्थीनी आणि जम्मू-काश्‍मीर पिपल्स मुव्हमेंट या राजकीय पक्षाची सदस्य शेहला रशीद हिच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीत शेहला यांच्या अटकेची मागणीदेखील करण्यात आली आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्‍मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर सैन्यही तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारविरोधात गैरसमज निर्माण होईल अशा फेक न्यूज पसरवल्याप्रकरणी शेहला रशीद विरोधात सर्वोच्च न्यायालयातील वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी तिच्या अटकेचीही मागणी केली आहे. दरम्यान, शेहला राशिदने याच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×