श्रीनगरमध्ये जवानांवर दगडफेक : खोऱ्यात पुन्हा निर्बंध लागू

श्रीनगर : कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्‍मीरमध्ये तब्बल 12 दिवसांनंतर काही निर्बंध शिथील करण्यात आले होते तसेच इंटरनेट आणि मोबाईलची सेवादेखील सुरू करण्यात आली होती. परंतु, राज्यातील परिस्थिती 24 तासाच्या आतच बिघडल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच भारतीय जवानांवर श्रीनगरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा तणावाचे वातवरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. सरकारकडून इंटरनेट आणि मोबाईल सेवा पुर्ववत झाल्यानंतर खोट्या बातम्या पसरवण्याचे पेव सुरू झाले होते त्यामुळे सुरू करण्यात आलेली इंटरनेट आणि मोबाईल सेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. तसेचकाश्‍मीरमध्ये आजपासून शाळा सुरु झाल्या आहेत. श्रीनगरमध्ये 190 पैकी 95 शाळा सुरु झाल्या आहेत. पण मुलांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. श्रीनगरमधल्या काही भागांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. काही युवक बाईकवरुन फिरुन कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दुकाने उघडू नका असे व्यापाऱ्यांना आव्हान करत फिरत होते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)