अत्यंत दुर्दैवी! खेळताना कापसाच्या ढिगात गुदमरून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

धुळे – खेळताना कापसाच्या ढिगात अडकून गुदमरून अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथे घडली. कृष्णा योगेश पाटील (वय 11) असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. कृष्णा हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कृष्णाचे आई-वडील कामासाठी शेतात गेले होते. घरात कृष्णा एकटा होता. तो कापसाच्या ढिगाऱ्यावर खेळत होता. त्याने कापसाच्या ढिगात खड्डे केले होते. मात्र खेळता-खेळता त्याचा तो तोल जाऊन त्या खड्ड्यात डोक्‍यावर पडला आणि त्याला बाहेर निघता आले नाही. बराच काळ अडकून पडलेल्या कृष्णाचा कापसाच्या गाठीमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाला.

शेतातील काम संपवून त्याचे आई-वडील घरी आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. मात्र त्यांना यायला उशीर झाला होता. कृष्णा अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे संपूर्ण डोंगरगावामध्ये ही बातमी पसरताच गावात एकच शोककळा पसरली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.