भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स


मुंबई –
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने पुन्हा समन्स जारी करून त्यांना 20 ऑक्‍टोबर रोजी आपल्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे. त्यांच्यावरही मनी लॉंड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भावना गवळी या यवतमाळ-वाशिमच्या खासदार आहेत. त्यांना या प्रकरणात या आधी 4 ऑक्‍टोबर रोजी समन्स जारी करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही तारीख बदलून मागितली होती.

त्यांना आता नव्याने 20 ऑक्‍टोबर साठीचे समन्स जारी करण्यात आले आहे. त्यांना ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये हजर राहायचे आहे. त्यांच्यावर जे प्रकरण दाखल आहे, त्या प्रकरणात सईद खान यांना सप्टेंबर महिन्यातच अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.