पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत रविवारी जेवढी काळजी घेतली गेली ती आज सकाळपासून सगळ्यांनीच मातीत घालवली. यामुळे पोलिसांनी दुपारी रस्त्यावर उतरत नागरिकांना काठीच्या जोरावर, घरी बस की बाबा…, असे आवाहन करीत अनेकांना घरी पाठवत होते.
दोन दिवसावर येऊन ठेवलेला गुढीपाडवा सण यासाठी भाजीमंडई कात्रज येथे साखरेच्या घड्या यांचे हार विकण्यास आली आहे. ते घेण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहेत. या घोड्यांची किंमत पंधरा ते वीस रुपये दरम्यान आहे. दरवर्षीप्रमाणे मात्र यावर्षी गुढीपाडव्याच्या सणाला साखरेच्या घड्या यांना कमी मागणी येत आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.