सेंच्युरियन : इआॅन माॅर्गन, जेमी बेअरस्टो आणि जोस बटलर यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने तिस-या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेवर ५ विकेटनी मात करत विजय नोंदविला. या विजयासह इंग्लंडने ही मालिका २-१ अशी जिंकली. इआॅन माॅर्गन सामनावीर व मालिकावीर ठरला.
Man of the match…
Man of the series…
Message for @Eoin16? 😍 pic.twitter.com/RZjOlaELhx— England Cricket (@englandcricket) February 16, 2020
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २२३ धावांचे आव्हान इंग्लंडने १९.१ षटकांत ५ बाद २२६ धावा करत सहज गाठले. इंग्लंडकडून फलंदाजीत जेमी बेअरस्टोने ६४(३४), जोस बटलरने ५७(२९), बेन स्टोक्सने २२(१२) आणि इआॅन माॅर्गनने नाबाद ५७(२२) धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडीने २, फेहलुकवायो, तबरेंज शम्सी आणि प्रीटोरियसने प्रत्येकी १ गडी बाद केला.
England win with five balls to spare 👏
They take the series 2-1 🏆 #SAvENG pic.twitter.com/fQpQ6jhUNr
— ICC (@ICC) February 16, 2020
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना हेनरिक क्लासेनच्या ६६(३३), टेम्बा बवुमाच्या ४९(२४), क्विंटन डी काॅकच्या ३५(२४) आणि डेविड मिलरच्या ३५(२०) धावांच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २२२ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून गोलंदाजीत बेन स्टोक्स आणि टाॅम करन यांनी प्रत्येकी २ तर मार्क वुड आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.