पाकिस्तान सरकारच्या भूमिकेने जागतिक स्तरावर खळबळ
लाहोर : जैश ए महंमद चा म्होरक्या मसूद अझर हरवला आहे… हे वाक्य गंमतीनं लिहलेलं नाही… ही आहे पाकिस्तान सरकारची अधिकृत भूमिका… पाकिस्तानची आर्थिक मदत रोखण्यासाठी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) बैठकीत शुक्रवारी निर्णय घेतला जाणार आहे. एफएटीएफची बैठक रविवारी सुरू झाली
पाकिस्तानने एफएटीएफला सांगितले की मसूद अझहरवर कोणाताही एफआयआर नोंदवला नाही कारण तो सापडलाच नाही. त्याला 2019मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी घोषित केले आहे. फेब्रुवारी 2018मध्ये एफएटीएफला पाकिस्तानातील मनी लॉड्रींग प्रकरणाचे अनेक तफावती आढळल्या होत्या. तो देश दहशतवादाला प्रोत्साहन आणि अर्थपुरवठा करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. एफएटीएफने त्यांचे 27 आक्षेप पाकिस्तानकडे दिले होते.
पुलवामा येथे गेल्यावर्षी 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्याच्या मागे जैश ए महंमदचा हात होता. या हल्ल्यात 40 जवान मरण पावले होते. त्यानंतर जैशचा बालालकोट येथील तळ भारताने हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केला होता.