इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा- अंनिस

मुंबई : इंदुरीकर महाराज आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहे. इंदुरीकर महाराज यांच्यावर गर्भलिंग चाचणी अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.

अनिसच्या कार्यकर्त्या रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्राद्वारे हि मागणी केली आहे. कीर्तनादरम्यान इंदुरीकरांनी “सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो; आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं वक्तव्य केले होते.

तसेच अशुभ वेळेला स्त्री संग झाल्यास अवलाद रांगडी, बेवडी आणि खानदानाचं नाव मातीत मिळवणारी होते. असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. तर काही ठिकाणी गावकऱ्यांनी इंदुरीकरांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्भलिंग चाचणी अधिनियम कायद्यातील कलम २२चे इंदुरीकर महाराजांनी उल्लंघन केल्याचे अनिसच्या पात्रात म्हंटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.