नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील खानापूर येथे एक ज्येष्ठ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती तालुका प्रशासन यांनी दिली.
दरम्यान तालुक्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 44 वर पोहोचली आहे. खानापूर गावात आज तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश घोडे, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी पाहणी करून खानापूर गाव 14 दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. गावात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.