जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कार्यभार डॉ.संजोग कदम यांच्याकडे

सातारा – क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर हे वैद्यकीय रजेवर गेले असून त्यांचा पदभार रुग्णालयातील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजोग कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. नितीन बिलोलीकर यांनी या संदर्भात आदेश बजावले आहेत. डॉ. गडीकर यांच्या रजा कालावधीत आणि पुढील आदेश होईपर्यंत डॉ. संजोग कदम यांनी स्वतःचे काम सांभाळून जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा अतिरिक्‍त कार्यभार सांभाळावा आणि तसा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.