नगर – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे “कोर पायथॉन’ या आधुनिक संगणक प्रोग्रामींग लॅग्वेज या विषयावर 28 जून ते 4 जुलै या दरम्यान एकुण सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यशाळेसाठी तंत्रज्ञ व इंजिनीअर मनोज एस कवेडिया, थाडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालय, बांद्रा, मुंबई हे या कार्यशाळेमध्ये ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत “पायथॉन’ या प्रोग्रामींग लॅग्वेजमधील सर्व मूळ संकल्पना समजावून सांगण्यात येणार आहेत. कार्यशाळेत प्रत्येक दिवशी शिकविलेल्या संकल्पनेवर एक तासाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी अंतिम परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल.
विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकास, तांत्रिक कौशल्य विकास व संभाषणकौशल्य तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असते. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. दीपक विधाते यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे. डॉ. विखे पा. फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर-टेक्निकल प्रा. सुनिल कल्हापुरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक यांनी या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या ऑनलाईन कार्यशाळेच्या आयोजनासाठी सेक्रेटरी जनरल, डॉ. बी. सदानंदा, डायरेक्टर (टेक्निकल) डॉ. पी.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.