पुणे : शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशव्यापी लॉकडाउनशी संबंधित गैरवापर करणारा संदेश एप्रिल फूल संदेशाच्या नावे पसरवू नयेत. अशाप्रकारे अप्रिय आणि चुकीचे संदेश पसरविणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती सहआयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली.
एप्रिल महिन्यात सुरूवातीच्या काळात नागरिक एप्रिल फुलच्या नावे संदेश पाठवितात. त्यामध्ये संदेश पाठवून समोरच्या व्यक्तीस मुर्ख बनविणे तसेच फसविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, कोरोनाच्या संदर्भात लोकांना मुर्ख बनविणारा संदेश पाठविल्यास पोलीसांतर्फे संबंधित व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन आणि इतर सदस्यांविरूद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.