‘वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी 50 लाखांचा निधी द्या’

मंत्री वळसे पाटील यांची मागणी

मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय साहित्य व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

मंचर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय सात प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरूर तालुक्‍यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आंबेगाव तालुक्‍यातील 48, शिरुर तालुक्‍यातील 16 उपकेंद्रे यासाठी वैद्यकीय साहित्य व यंत्रसामग्री खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

आवश्‍यक साधनसामग्री इन्फ्रारेड थर्मामीटर, पीपीई किट, करोना टेस्टिंग किट, पल्स ऑक्‍सीमिटर, क्रॅंश कार्ट, डिफीब्रिलेटर, ऑक्‍सीजन सिलेंडर मीडियम, ऑक्‍सीजन सिलिंडर जंबो, ऑक्‍सीजन फ्लोमीटर, लॅंरिंगो स्कोप सेट, आयव्ही स्टॅंड, एक्‍झामिनेशन मुव्हेबल लॅंम्प, पोर्टेबल एक्‍स-रे मशीन, सक्‍शन मशीन इलेक्‍टिक, सक्‍शन मशीन, फूट सक्‍शन, नेबुलाइजर कॉम्प्रेसर, गम बूट, सर्जिकल डम, एंडोटॅंकीयल ट्‌यूब विथ कनेक्‍शन, सोडियम हाईप्रो क्‍लोराइडसोलुशन पाच लिटर जार, व्हेंटिलेटर, फाऊलेर बेड, इन्फ्युजन पंप, स्टोरिलियम एन 95 मास्क, थ्री लेयर्ड सर्जिकल मास्क, सर्जिकल कॅम्प, सर्जिकल ग्लोब्ज, फुली ऍटो सेल काउंटर, अशी विविध ऱ्साहित्य खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र दिल्याची माहिती मंत्री वळसे पाटील यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.