मुंबई : मुंबईत एक कोरोना संशयित डॉकटरचा मृत्यू शुक्रवारी सायंकाळी झाला. त्यामुळे राज्यातील बळींची संख्या पाचवर पोहोचली आहे. तर मुंबईतील हा चौथा बळी आहे. तर देशातील बळींची संख्या 20 वर गेली आहे.
या डॉक्टरांवर सुरवातीला एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना कस्तूरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या कोरोना चाचणीचा निकाल अद्याप प्रतिक्षेत आहे.
या डॉक्टरांना मधुमेहाचा विकार होता. त्याचबरोबर त्यांना पेसमेकरही बसवण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूने या साथीचे गांभीर्य अधिक वाढले आहे. दरम्यान, राज्यातील बाधितांची संख्या 153वर पोहोचली आहे.