मुंबई – आंबा वाहतुक करणाऱ्या ड्राईव्हर बदल सांगुनही लक्ष दिले नाही. ग्रीन झोन चे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे. असे ट्विट करत नितेश राणे यांनी जिल्ह्यात नव्याने सापडलेल्या रुग्ण्यामुळे प्रशासनावर टीका केली आहे.
सिंधुदुर्ग मध्ये करोना नाही पण प्रशाशना च्या हलगर्जी मुळे अजून एक रुग्ण सापडला आहे!
जिल्हा प्रशासनाने घरी सोडलेला व्यक्तीला करोना झाले असे समजते..
आंबा वाहतुक करणाऱ्या ड्राईव्हर बदल सांगुनही लक्ष दिले नाही..
ग्रीन झोन चे स्वप्न पाहणारा आमचा जिल्हा रेड झोन कडे वाटचाल करत आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) May 5, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक करोनाबाधित रूग्ण सापडला आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. नव्याने सापडलेला रुग्ण हा आंबा वाहतुकीतील चालक आहे. गेल्या २६ एप्रिल रोजी तो मुंबईला गेला होता. दुसऱ्या दिवशी, २७ एप्रिल रोजी तो परत आला. त्यानंतर त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
दरम्यान ‘आंबा वाहतुक करणाऱ्या ड्रायव्हरबद्दल सांगूनही लक्ष दिले नाही’ असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ग्रीन झोनचे स्वप्न पाहणाऱ्या सिंधुदुर्गची रेडझोनच्या दिशेने वाटचाल सुरु आहे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे