शांताराम बापु कटके मित्र परिवाराचा उपक्रम
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शांताराम बापु कटके मित्र परिवार व जिओदन इंडिया प्रा.लि कंपनी रांजणगाव यांच्या वतीने वाघोली मधील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाला आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात करून कामगार दिन साजरा करण्यात आला.
वाघोली गावातील प्रत्येक भागात जाऊन सर्वेक्षण व साफ सफाई करनारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावा च्या काळात सर्वाना रेशनिंग चे धान्य मिळावे तसेच आपल्या राज्यात अडकलेले नागरिक स्वगृही परतावे ही माहिती संकलित करणारे तलाठी कार्यालयातिल सर्व महसूल कर्मचारी,लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पत्रकार बांधव यांना मास्क आणि हॅन्ड ग्लोज, चे वाटप माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे,माजी सरपंच शिवदास उबाळे, ग्रामविकास अधिकारी एम पी चव्हाण, ऋषिकेश सातव, प्रतीक शिवरकर, दीपक भंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी जिओदन इंडिया कंपनी चे मॅनेजर ऋषिकेश गावडे, अबीद शेख, शनिभाऊ शिनगारे, विक्रम वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले.