रांची – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी थेट लढा देत असलेल्या पोलीस व आरोग्यकर्मींना देखील कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे समोर येतायेत. असंच एक प्रकरण रांचीतील राजेंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये उघडकीस आले आहे. येथील कोरोना चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेतील एक कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह असल्याचं निदर्शनास आलंय.
दरम्यान, प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समजताच राजेंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेची ही कोरोना चाचणी करणारी प्रयोगशाळा पुढील ३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. प्रयोगशाळेमध्ये कोरोना चाचणीसाठी जमा करण्यात आलेले सॅम्पल देखील इतर प्रयोगशाळांकडे सोपवण्यात आले असून येत्या ३ दिवसांसाठी लॅब सील करण्यात आली आहे.
Microbiology dept of Rajendra Institute of Medical Sciences (RIMS),Ranchi sealed for 3 days after a lab technician tested #COVID19 positive y’day. RIMS will not conduct COVID tests during this period.Samples already collected will be sent to other lab: Dr DK Singh, RIMS Director
— ANI (@ANI) May 1, 2020