सातारा – येथील लिंगायत समाज महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाचे ‘बसव भूषण जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये भारतशेठ बारवडे (समाजभूषण), महालिंगप्पा मेनकुदळे (काव्य आणि साहित्य भूषण), दिलीप पिलके (सहकार भूषण), राजेंद्र आटकेकर (उद्योजकता भूषण) आणि राजेंद्र लोखंडे (कृषीभूषण) या मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
उद्या रविवार दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता बुदवार पेठेतील औंधकर महाराज मठामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. याप्रसंगी काकासाहेब कोयटे, सुनीलशेठ रुकारी, प्रदीपबापू वाले, प्रकाश गवळी, राजेंद्र घुटे आदी मान्यवर लिंगायत नेते मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी समाजातील बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळाचे सचिव महादेव मेंडीगेरी यांनी केले आहे.