मंचर : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची गृहनिर्माण संस्था म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड होताच शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. मंचर येथे शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.
शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी सायंकाळी गृहनिर्माण विभागाचे सचिव अजित कवडे यांनी पारित केले आहेत.
त्या आनंदाप्रित्यर्थ मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवार, दि. १७ रोजी शिवसैनिकांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे. यावेळी शिवसैनिकांच्या वतीने खासदार आढळराव पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचेही आभार मानण्यात आले आहे.
यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील हेच शिरूर लोकसभेवर भगवा फडकवतील असा विश्वासही भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, प्रकाश काजळे यांनी व्यक्त केला .यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले,
माजी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बेंडे पाटील, जिल्हाप्रमुख मालतीताई थोरात, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, राजु सोमवंशी, संगीता क्षीरसागर, अशोक थोरात, रोशन थोरात पंकज बाणखेले, , बाळासाहेब मोरडे, प्रशांत काळे, स्वप्नील निघोट, सुशांत रोकडे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.