पुन्हा धाकधूक वाढली! एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’ राज्याने चिंता वाढवली

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत असतानाच आरोग्य यंत्रणेसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे.  काल देशात ४ महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आढळली होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आज पुन्हा ४० हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळली आहे.

देशात कालच्या तुलनेत ४७ टक्के रुग्णवाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ६५४ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर, गेल्या २४ तासात ४१ हजार ६७८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ०६ लाख ६३ हजार १४७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २२ हजार ०२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.