मुंबई – उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. सध्या सोशलवर या प्रकणावरून राज कुंद्रावर व शिल्पावर चांगलीच टीका केली जात आहे.
यावरून आज पुणे येथे राज ठाकरे यांना पत्रकरांनी प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रकणारवर मिश्किल टिप्पणी केली. राज कुंद्राबाबत प्रश्न विचारलं असता, राज ठाकरेंनी हसत म्हटलं, सर्व कालं का कान नाक? किती वेळा तेच तेच. मी काय कुंद्रा आहे का? असं म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली.
दरम्यान, या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली. या वेळी आणि शिल्पा यांना समोरासमोर बसवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचाही porn flims प्रकरणात सहभाग आहे का? शिल्पाला यातून आर्थिक लाभ झाला का? या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलिसांच्या रडारवर आली आहे.