पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त २० बाय १५ फूटी रंगावली साकारण्यात आली असून ९९ दिवे प्रज्वलित करण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळातर्फे
आयोजन शिवचरित्र प्रसारासाठी आयुष्यभर कार्य करणार्या पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे वयाच्या शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत, त्यांना मानवंदना देण्यासाठी या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.