मुंबई – नुकत्याच कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवित भाजपला पराभवाची धूळ चारली असल्याचं दिसून आलं आहे. कर्नाटकात दणदणीत विजय मिळविल्यानंतर आता काँग्रेसने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्या डावपेचांमुळे काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळविता आला,
तेच डावपेच आता महाराष्ट्रात अंमलात आणण्याचा विचार काँग्रेसतर्फे सुरू आहे. आणि यासाठी काँग्रेसने आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रात कोणताही कर्नाटक पॅटर्न लागू दिला जाणार नाही, असा निर्धारच त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी ते नांदेड मध्ये एका सभेला संभोधित करत होते.
There is no Karnataka pattern in Maharashtra, there is only one pattern Chhatrapati Shivaji Maharaj pattern !
महाराष्ट्रात कोणताही कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पॅटर्न!
महाराष्ट्र में कर्नाटक पैटर्न नहीं, यहाँ सिर्फ… pic.twitter.com/q6pEFX18dJ
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 17, 2023
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात कोणताही कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, आज पर्यंत त्यांना कर्नाटक म्हंटलं की, राग येत होता… इथे फक्त एकच पॅटर्न चालतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पॅटर्न! आणि तो पॅटर्न संपूर्ण देशात कोणी आणला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणला आहे. आणि त्यामुळे इथून पुढे फक्त मोदी पॅटर्न चालणार, असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हंटलं आहे.