मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतंच 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आणि अखेर 16 जून रोजी हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला देखील आला. या चित्रपटात साऊथ अभिनेता प्रभास मुख्य भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे.
साऊथ अभिनेत्यांची त्यांच्या फॅन्समध्ये प्रचंड क्रेझ असते हे आपल्याला माहीतच आहे. त्यांचे फॅन्स आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी वेडे असतात. त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालण्यापासून ते त्यांची आरती देखील चाहते करत असतात.
Offline cult fans 🥵🔥
Beer bottle cheyyi koskunnadu 🙏🏼#Prabhas #Adipurush #AdipurushCelebrations pic.twitter.com/FZl3PfAww1
— ❌ BEAST ❌ (@thedevilmonstr) June 16, 2023
दरम्यान, बाहुबली स्टार प्रभासचा आदिपुरुष रिलीज झाल्यानंतर त्याच्या एका फॅन्सने तर हद्दच पार केल्याचं दिसून आलं आहे. सध्या एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून, यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट अश्या कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रभासचा एक चाहता बिअरच्या बाटलीने त्याचा हात कापताना दिसत आहे. त्याच रक्ताने हा माणूस ‘आदिपुरुष’च्या पोस्टरवर प्रभासच्या कपाळावर टिळक लावताना दिसत आहे. हा व्हिडिओ आंध्र प्रदेश किंवा तेलंगणातील असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे.