Delhi Meerut RRTS : देशाला आज पहिली सेमी हायस्पीड रॅपिड एक्स ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून रॅपिड एक्स ट्रेन कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. पहिल्या टप्प्यात ही ट्रेन साहिबाबाद ते दुहई या १७ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर धावणार आहे. त्यानंतर हे अंतर काही मिनिटांत पार करता येईल. या गाड्या ‘नमो भारत’ म्हणून ओळखल्या जातील.
21 ऑक्टोबरपासून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेत ही रेल्वे सादर होणार आहे. पीएम मोदींनी मार्च 2019 मध्ये दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली होती. PM मोदी आज गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादला पोहोचतील. यानंतर ते कॉरिडॉरची पाहणी करतील आणि त्यानंतर रॅपिड एक्स ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. या काळात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
रॅपिड एक्स ट्रेनला ‘नमो भारत’ नावाची ओळख मिळेल. त्याचे नाव बदलण्यात आले आहे. काही वेळाने पीएम मोदी गाझियाबादला पोहोचतील तेथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.