नवी दिल्ली : येथील मुनदका औद्योगिक वसाहतीतील बॅटरी कारखान्याला आग लागून नंतर झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळून त्याखाली अडकलेल्या 12 जणांची सुटका करण्यात दुपारी एक वाजेपर्यंत यश आले, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या सुत्रांनी दिली. अग्नीशामक दलाचे 35 बंब घटनास्थळी सकाळीच रवाना झाले होते.
#WATCH Delhi: Fire that broke out a factory in Peeragarhi, early morning today, not yet doused. Firefighting operations underway. More than 12 people have been injured due to the fire. pic.twitter.com/UrOsGqF5Ua
— ANI (@ANI) January 2, 2020
राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्नीशमन दलाचे या इमारतीत अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम विहार येथील नजिकच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. इमारतीत अडकलेल्या लोकांमध्ये चार अग्निशामक दलाच्या जवानांचा समावेश होता. त्यापैकी तीन जणांची सुटका करण्यात आली, अशी माहिती अग्नशामक दलाचे उपप्रमख धर्मपाल भारद्वाज यांनी दिली.
Rajendra Sagar,Additional DCP(Outer) on Peeragarhi factory fire: 14 people have been injured in the incident,including 13 fire brigade personnel. The back portion of the building has collapsed, fire though is in control now,rescue ops continuing. #Delhi pic.twitter.com/vhEIpSD3Lh
— ANI (@ANI) January 2, 2020
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशामक दलाचे 35 बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. तेथे झालेल्या स्फोटात अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक जण अडकले आहेत.
पहाटे 4 वाजून 23 मिनिटांनी उद्योगनगरमधील पीराग्रही भागातील कारखान्याला आग लागली असल्याचा फोन आला. त्यावेळी सात बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले, असे दिल्ली अग्नीशमन विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले.
मात्र आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु असताना तेथे स्फोट झाला. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह काही जण अडकले. तेथे मदत कार्य सुरू आहे.
(मदत कार्य सुरू असल्याने तेथील घटनांची प्रत्येक खबरबात डिजिटल प्रभातमध्येच)