सध्याचे दिवस लाटेवर स्वार होण्याचे आहेत. राजकारणातील लाटांची बरीच चर्चा होत असते; पण बॉलीवूडमध्येही अशा “लाटा’ येताना दिसतात. कुटुंबप्रधान चित्रपटांची लाट, प्रेमत्रिकोणांची लाट किंवा एकतर्फी प्रेमावर आधारित चित्रपटांचा प्रवाह मागील काळात बॉलीवूडमध्ये येऊन गेला.
View this post on Instagram
सध्या सिनेसृष्टीत लाट आहे ती रिमेक आणि सिक्वलची. एका बाजूला जुन्या चित्रपटांचे रिमेक बनवून प्रेक्षकांना आकर्षित केले जात आहे; तर दुसऱ्या बाजूला सुपरहिट झालेल्या चित्रपटांचे सिक्वल बनवण्याचा उद्योगही तेजीत आहे.
“हाऊसफुल’सारख्या चित्रपटांचे तर चौथे भागही येऊन गेले आहेत.
आता या लाटेवर बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरही स्वार झाला आहे. अक्षयकुमार आणि सैफ अली खान या धमाकेदार जोडीमुळे तुफान गाजलेल्या “मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचे करणने ठरवले असल्याचे समजते. 1994 मध्ये आलेल्या या चित्रपटातील “ओले आले’ हे गाणे सुपरडुपर हिट झाले होते.
View this post on Instagram
Dots and commas ! #christmasspirit styled by @nikitajaisinghani in @nikhilthampi ? @rahuljhangiani
चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता करणने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटाचे मॉडर्न व्हर्जन बनवण्याचा करणचा इरादा आहे. या रिमेकपटासाठी करण सध्या नव्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, लवकरच याबाबतची घोषणा केली जाऊ शकते.