दिल्ली : आयपीएलच्या 16व्या हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघ दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत 8 बाद 162 धावा केल्या असून गुजरात टायटन्ससमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 32 चेंडूत 37 तर उपकर्णधार अक्षर पटेलने 22 चेंडूत 36 धावा केल्या. अक्षरने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार लगावले. सर्फराज खान 30 तर अभिषेक पोरेल 20 धावा करून बाद झाला. 10 पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले.
A fighting total put up by our batters at #QilaKotla 💪
Onto the defence now 🛡#YehHaiNayiDilli #IPL2023 #DCvGT pic.twitter.com/57W9YqnRE4
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 4, 2023
गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी शानदार गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या तर अल्झारी जोसेफला दोन विकेट घेण्यास यश आलं.
दरम्यान, दिल्लीला मोसमातील पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. गेल्या सामन्यात दिल्लीला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी गुजरातने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.