पुणे – हेमंत पाटील प्रतिष्ठान तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत धीरज फतंगरे(118धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघावर 144 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
व्हिजन क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने 50 षटकांत 8 बाद 319 धावा केल्या. यात धीरज फतंगरेने 108 चेंडूत 17 चौकार व 1 षटकारासह 118 धावांची निर्णायक खेळी केली. धीरजला शुभम याने 31 चेंडूत 82 धावा करून सुरेख साथ दिली.
धीरज व शुभम या सलामीच्या जोडीने 139 चेंडूत 152 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर तुषार श्रीवास्तवने 79 धावा व आशय पालकरने 14 धावा करून संघाला 318 धावांचे लक्ष उभे करून दिले. व्हेरॉक संघाकडून विजय पाटीलने 51 चेंडूत 5 गडी बाद केले.
या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 35 षटकांत 175 धावांवर आटोपला. यात ओम भोसले 42, विनय पाटील 24, सौरभ नवले 22, सुधांशू गुंडेती 15, राहुल वारे नाबाद 15 यांनी थोडासा प्रतिकार केला. डेक्कन जिमखाना संघाकडून आर्यन बांगळेने अफलातून गोलंदाजी करत 26 धावांत 4 गडी बाद केले. सामन्याचा मानकरी धीरज फतंगरे ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डेक्कन जिमखाना इलेव्हन : 50 षटकांत 8 बाद 319 धावा (धीरज फतंगरे 118(108,17चौकार,1षटकार), शुभम 82(31, 4चौकार,9षटकार), तुषार श्रीवास्तव 79(67,12चौकार), आशय पालकर 14, विजय पाटील 5-51, कार्तिक पिल्ले 2-55) वि.वि. व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी : 35 षटकांत सर्वबाद 175 धावा (ओम भोसले 42(31,6चौकार), विनय पाटील 24(21), सौरभ नवले 22(18), सुधांशू गुंडेती 15, राहुल वारे नाबाद 15, आर्यन बांगळे 4-26, तुषार श्रीवास्तव 1-10, प्रखन अगरवाल 1-17, धीरज फतंगरे 1-15, आशय पालकर 1-40);सामनावीर-धीरज फतंगरे.