वडिलांचे ऐकत नाही, तो जनतेचे काय ऐकणार- रोहित पवार

जामखेड: विखे घराणे हे भावनिक राजकारण करण्यात पटाईत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे कॉंग्रेसमध्ये असूनही दुटप्पी भूमिका घेतात व मुलाच्या हट्टापायी भाजपचा उघड प्रचार करतात, मात्र जो वडिलांचे ऐकत नाही, तो जनतेचे काय ऐकणार असा टोला रोहित पवार यांनी लावला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी जामखेड तालुक्‍यातील 14 गावांना भेटी दिल्या. त्या नंतर सायंकाळी शहरातील डॉक्‍टर्स, मेडिकल, वकिल संघटना यांच्यासह विविध सामाजिक संस्थांशी संवाद साधला.यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शरद भोरे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, कॉंग्रेसचे युवा नेते रमेश आजबे, तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, राहुल उगले, डॉ.कैलास हजारे, डॉ.अमजद पठाण, संजय वराट, नितीन गोलेकर, नगरसेवक अमित जाधव, दिंगबर चव्हाण, पवनराजे राळेभात, ऍड. हर्षल डोके, डॉ. अविनाश पवार, मेडिकलचे अध्यक्ष माउली गायकवाड, डॉक्‍टरचे अध्यक्ष डॉ. प्रदिप कात्रजकर उपस्थित होते.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या सरकारच्या त्रासाला कंटाळला आहे. सध्या शिक्षण, बेरोजगारी, रस्ते व पिण्याच्या पाण्याची लोकांना अत्यंत गरज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या छावण्यांची मागणी वाढत आहे मात्र छावण्यांमध्ये देखील भेदभाव हे सरकार करत आहे. छावण्या सर्वसामान्यांना देखील मिळाल्या पाहिजेत. 2014 साली विकासाच्या मुद्यावर भाषणे करून हे सरकार सत्तेवर आले, मात्र विकास तर बाजुलाच पण जनतेची दिशाभूल करण्याचे काम झाले आहे. लोकांचा उत्साह पाहून इतकच सांगू वाटतं की, कर्जत जामखेड परिसरातून उमेदवार संग्राम जगताप यांना मिळणारे मताधिक्‍य हे राजकीय विश्लेषकांना आश्चर्यचकित करणारे असेल.


पवार, मुंडे दि. 17 रोजी दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि.17 एप्रिल रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची जामखेड तर दि.18 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कर्जत येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.