नवी दिल्ली : देशावर घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र वादळातून पुन्हा अतितीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत रुपांतर झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आढावा बैठक घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी चक्रीवादाळाची परिस्थिती आणि किनारपट्टी भागातील उपाययोजनांचा आढावा घेतला. किनारपट्टी भागातील लोकांचं सुरक्षिण स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. गुजरात किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
#WATCH | Gujarat | Rough sea conditions and strong winds witnessed in Dwarka, as an effect of #BiparjoyCyclone. Visuals from Gomtighat in Dwarka.
As per IMD’s latest update, VSCS (very severe cyclonic storm) Biparjoy lay centred at 02:30 IST over the Northeast and adjoining east… pic.twitter.com/oesjASr8R0
— ANI (@ANI) June 13, 2023
गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ पोर्टजवळून ओलांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे.