सायबर विभागामुळे परत मिळाले 50 लाख

ऑनलाइन फसवणूक :विदेशातील बॅंक खात्याचे व्यवहार थांबविले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या सायबर विभागामुळे आनलाइन फसवणूक झालेल्या शहरातील दोन बड्या कंपन्यांना त्यांचे सुमारे 50 लाख रुपये परत मिळाले. या दोन्ही कंपन्या विदेशातील कंपन्यांसोबत खरेदी-विक्री करत असल्याने हॅकर्सने त्याने खोटे ई-मेल पाठवून 50 लाख रुपये दुसऱ्याच खात्यांमध्ये भरण्यास भाग पाडले होते. ही रक्‍कम सायबर विभागाने कंपन्यांना परत मिळवून दिली आहे.

वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील मित्तल प्रिसिजन प्रेशर डाय कास्टिंग एलएलपी या कंपनीने चीनमधील एका कंपनीकडून 24 ऑगस्ट 2019 रोजी एक उत्पादन खरेदी केले होते. या उत्पादनाचे बिल देण्यासाठी चिनी कंपनीकडून एक बॅंक खात्याचा क्रमांक देण्यात आला. मात्र थोड्याच वेळेत चिनी कंपनीच्या नावसदृष्य आणखी एक ई-मेल आला. त्यामध्ये बिल देण्यासाठीची बॅंक आणि खाते क्रमांक बदलण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानुसार कंपनीने बदललेल्या बॅंक खात्यावर 44 लाख 79 हजार 917 रूपये ट्रान्सफर केले.
तसेच बिलाचे पैसे मिळाले का, याबाबत खात्री करण्यासाठी चिनी कंपनीकडे विचारणा केली. मात्र बिलाचे पैसे मिळाले नसल्याचे चिनी कंपनीने सांगितले. फसवूणक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने त्वरीत सायबर विभागाशी संपर्क साधला.

सायबर सेलच्या अधिकाऱ्यानह मित्तल यांच्या आणि चिनी कंपनीच्या मेल आयडीचे सायबर ऍनालिसिस केले असता विदेशातील कंपनीचा मेल आयडी हॅक झाल्याचे सायबर सेलच्या लक्षात आले. त्यामुळे तात्काळ “युके’ येथील बॅंकेसोबत ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करुन पैशांचा व्यवहार थांबविण्याबाबत कळविले. त्यानंतर परदेशातील बॅंकेकडे पाठपुरावा करुन मित्तल कंपनीची फसवणूक झालेली 44 लाख 79 हजार 917 रुपये भारतीय कंपनीच्या बॅंक खात्यावर परत मिळविण्यात सायबर विभागाला यश आले.

ई-मेल आयडी बंद झाल्याचे सांगून फसवणूक
त्याचप्रमाणे लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल या कंपनीला विदेशातील एक कंपनी कच्चा माल पुरविते. या कंपनीचे दोन्ही ई-मेल आयडी बंद झाले असल्याचा ई-मेल ठगांनी केला. आपल्या कंपनीला कच्चा माल लागत असल्यास नवीन ई-मेल आयडीवर मेल करा असे कळविले होते. त्यानुसार लुमिनियस या कंपनीने विदेशातील कंपनीकडे कच्चा मालाची मागणी करताच ठगांनी न्यूयॉर्क मधील एका बॅंकेचा खाते क्रमांक देऊन त्यावर पाच लाख 97 हजार 376 रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार लुमिनियस कंपनीने दिलेल्या बॅंक खत्यावर पैसे भरले.

पैसे भरल्यानंतर काही दिवसांनी विदेशातील कंपनीला कच्चा माल मिळविण्यासाठी फोन केला असता, आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे आणि कोणतेही ई-मेल आयडी बंद झाले नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात कंपनीने सायबर विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. साबयर सेलने परदेशातील बॅंकेत गेलेली रक्कम परत मिळविण्यासाठी संबंधित बॅंकेला पत्रव्यवहार व फोन करुन त्या खात्यातील व्यवहार थांबविण्यास कळविले. यामुळे न्यूयॉर्क मधील बॅंकेने लुमिनियस सेल्स इंटरनॅशनल कंपनीची फसवणूक झालेली पाच लाख 97 हजार 376 रुपये पुन्हा कंपनीच्या खात्यात वर्ग केले.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्‍त प्रकाश मुत्याल, अपर आयुक्त रामनाथ पोकळे सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक निरीक्षक गरुड, उपनिरीक्षक निलेश बोडखे, स्वाती लामखडे, कर्मचारी मनोज राठोड, भास्कर भारती, अतुल लोखंडे, नितेश बिचेवार, विशाल गायकवाड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, नाजुका हुलवळे, स्वप्नाली जेधे यांचे पथकाने ही कामगिरी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)