World Cup 2023 IND vs ENG Match Live Score :- आज, एकदिवसीय विश्वचषक 2023च्या 29व्या सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. लखनौच्या एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
रोहित शर्मा बाद…
भारताला 37व्या षटकात 164 धावांवर पाचवा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा 101 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 87 धावा करून बाद झाला. त्याला आदिल रशीदने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. रोहितने सूर्यकुमारसोबत पाचव्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली.
CWC2023. WICKET! 36.5: Rohit Sharma 87(101) ct Liam Livingstone b Adil Rashid, India 164/5 https://t.co/Jki6Vd2GY0 #INDvENG #CWC23
— BCCI (@BCCI) October 29, 2023
IND vs ENG Live Score : सध्या 40.2 षटकाचा खेळ झालेला आहे आणि भारतीय संघाने 5 गडी गमावून 182 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव 31*(33) आणि रविंद्र जडेजा 8*(12) धावांसह खेळत आहे.
भारताला चौथ्या षटकात 26 धावांवर पहिला धक्का बसला. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. शुभमनला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या. त्यानंतर लगेचच 27 च्या स्कोअरवर डेव्हिड विलीने टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. विराट कोहली खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली आठ चेंडूत खाते उघडू शकला नाही आणि दबावाखाली दिसत होता. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर अन् नवव्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्नात विराट स्टोक्सला झेल देऊन बसला.
12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 16 चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. श्रेयसला मार्क वूडने ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केले. शॉर्ट बॉलवर श्रेयस पुन्हा एकदा बाद झाला. ही त्याची कमजोरी आहे आणि विश्वचषत स्पर्धेत तो या चेंडूवर अनेक वेळा बाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धही तो शॉर्ट बॉलवर बाद झाला होता. शॉर्ट बॉल मारण्याचा प्रयत्नात श्रेयस विकेट गमावून बसला. भारतानं चौथी विकेट 131 धावांवर गमावली. लोकेश राहुल 58 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. डेव्हिड विलीने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. रोहित आणि राहुल यांच्यात चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागिदारी झाली.