Live Cricket Score IND vs ENG 3rd Test Day 2 (Ben Duckett) : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला. सध्या इंग्लंडचा पहिला डाव सुरू आहे.
या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने ( Ben Duckett ) 88 चेंडूत शतक झळकावले. त्याचे हे कसोटीतील तिसरे शतक ठरले. इंग्लिश फलंदाजाचे हे भारतामधील कसोटीतील सर्वात जलद शतक आहे. त्याचबरोबर ओवरऑल परदेशी फलंदाजाचे हे तिसरे जलद शतक आहे. ( Ben Duckett has blasted the third-fastest Test ton by a visiting batter in India ) याआधी ॲडम गिलख्रिस्टने 2001 मध्ये भारतात 84 चेंडूत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉईडने 1974 मध्ये 85 चेंडूत शतक झळकावले होते.
भारताविरुद्ध सर्वात वेगवान कसोटी शतक (चेंडूनुसार)
84 चेंडू : ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), मुंबई 2001
85 चेंडू : क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडीज), बेंगळुरू 1974
88 चेंडू : बेन डकेट (इंग्लंड), राजकोट 2024*
99 चेंडू : रॉस टेलर (न्यूझीलंड), बेंगळुरू 2012
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस असून भारतीय संघाचा पहिला डाव 445 धावांवर संपला आहे.