World Cup 2023 IND vs ENG Match Toss Update : वर्ल्ड कप 2023 चा 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीय खेळाडूंनी (indian Team) हातावर काळ्या पट्ट्या बांधूनच आपल्या डावाची सुरुवात केली. माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारताचे खेळाडू हातावर काळी पट्टी (IND vs ENG) बांधून मैदानात उतरले आहेत.
बीसीसीआयने (BCCI) आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केले की टीम इंडिया बिशन सिंग बेदी यांना श्रद्धांजली म्हणून काळ्या पट्ट्या घालेल. नुकतेच 23 ऑक्टोबर रोजी बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले होते. माजी भारतीय खेळाडू बिशनसिंग बेदी यांची गणना भारताच्या महान फिरकीपटूंमध्ये केली जाते. (World Cup 2023)
#TeamIndia will be wearing Black Armbands in memory of the legendary Bishan Singh Bedi before the start of play against England in the ICC Men’s Cricket World Cup 2023.#CWC23 | #MenInBlue | #INDvENG
— BCCI (@BCCI) October 29, 2023
12 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट
बिशनसिंग बेदी (Bishansingh bedi) यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चमकदार राहिली आहे. डावखुऱ्या फिरकीपटूने 22 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 12 वर्षे टिकली. बेदी यांनी 1967 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि 1979 मध्ये शेवटचा सामना खेळला.
23 ऑक्टोबर रोजी झाले निधन
भारताच्या दिग्गज फिरकीपटूने आपल्या कसोटी कारकिर्दीत एकूण 266 विकेट घेतल्या. त्याच वेळी, त्याने भारतासाठी एकूण 10 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 7 विकेट घेतल्या. बिशनसिंग बेदी यांचे 23 ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.