लंडन : लिलावामध्ये अनेक चित्र विचित्र वस्तूंची खरेदी विक्री केली जात असते. अनेक वेळा या वस्तू जुन्या प्राचीन आणि कोणत्यातरी घटनेशी निगडित असतात. समाजातील अनेकांना अशा विचित्र गोष्टी खरेदी करण्याची हौस असते लंडनमध्ये नुकत्याच अशा एका चित्राची खरेदी झाली आहे.
ज्या चित्राला शापित किंवा हॉंटेड मानले गेले होते. हे एका लहान मुलीचे चित्र असून यापूर्वी दोनदा या चित्राची विक्री झाली होती, पण विक्रीनंतर हे चित्र शापित असल्याचे समजून खरेदी करणाऱ्यांनी ते पुन्हा संस्थेला आणून दिले होते. आता तिसऱ्यांदा या चित्राची विक्री झाली असून त्यासाठी खरेदी करणाऱ्यांनी तब्बल 1600 डॉलर्स मोजले आहेत.
ईस्ट सक्सेस प्रदेशातील एका ऑनलाईन लिलाव करणाऱ्या संस्थेने याबाबतची जाहिरात दिली होती हे चित्र यापूर्वी त्यांच्याकडूनच दोनदा विक्रीला गेले होते. पण त्यानंतर ज्याने खरेदी केले होते त्यांनी ते चित्र परत आणून दिले होते.
आता या संस्थेने पुन्हा एकदा आपल्या वेबसाईटवर शी इज बॅक अशी जाहिरात करून हे चित्र पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले त्यानंतर एका शौकिनाने हे चित्र तब्बल 1600 डॉलर्सला ऑनलाइन पद्धतीने खरेदी केले.
यापूर्वी झो एलियट नावाच्या एका महिलेने ने हे चित्र खरेदी केले होते, पण ते चित्र खरेदी करून घरी जात असतानाच कोणीतरी आपला पाठलाग करत आहे आणि कोणीतरी सतत आपल्या मागावर आहे अशी भावना तिच्या मनात निर्माण होऊ लागली.
हे चित्र घरी नेल्यानंतर सुद्धा मनात विनाकारण संशयाचे आणि भीतीचे वातावरण तयार झाले, त्यामुळे हे चित्र शापित असावे असे वाटल्याने त्याने ते पुन्हा संस्थेकडे परत केले होते.