सचिन केदारी
पौड – निसर्गरम्य तसेच विलोभनीय दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी कोसळणाऱ्या धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक पळसे धबधबा, ताम्हिणी घाट, लवासा सिटी, मुळशी धरण, हाडशी येथील साई मंदिर, तिकोणा किल्ला, हाडशी डॅंम, कोराई गड, घनगड, वांद्रे येथील दरी पॉंईट येथे पर्यटन करिता येत असतात.
मुळशी येथील प्रसिद्ध असलेला पळसे धबधब्यावर पर्यटकांनी खूप गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. धबधब्याच्या पाण्यात जाऊन पर्यटक भिजत आहेत. यामध्ये लहान दोन वर्षाच्या मुलांपासून तरुण, महिला या सेल्फी काढत आहेत.
सेल्फी घेण्याच्या नादात दुर्घटना होण्याची भीती राहिली नाही. धबधब्याजवळ नागरिकांना पाण्यात धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षारक्षक अथवा पोलीस नसल्याने नागरिक बिनधास्त पाण्यात बसत आहे.
सेल्फीचा मोह
आधुनिक काळानुसार सेल्फीची क्रेज मुळशीत वाढलेली दिसत आहे. बोर्ड आणि निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांची सेल्फी घेण्याचा मोह काही केल्या कमी होताना दिसत नाही.