वाठार स्टेशन (प्रतिनिधी) : सोळशी (ता. कोरेगाव) येथे रात्री झालेल्या घरफोडीत ५७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. वाठार स्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दि. २ रोजी सोळशी येथील संजय बळवंत उगले (वय ५२)यांच्या घराची अज्ञाताने रात्री साडेअकरा ते चारच्या दरम्यान बाहेरून कडीकोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला.
घरातील सोन्याच्या दोन अंगठ्या, राणीहार तीन तोळ्याचा, दोन सोन्याच्या नथ, कानातील दोन सोन्याची कर्णफुले, सोन्याचा बदाम व तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हँडसेट, तसेच रोख रकमेसह एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशनला दाखल झाली असून पुढील तपास पीएसआय महेश पाटील करीत आहेत.